
१
मत-मतांतरे
---------
पुरोगामी पाऊल
राज्य शासनाने मुंबई येथे तृतीयपंथीयांसाठी महाविद्यालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हे पुरोगामी टाकलेले पाऊलच असून, आजही समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. राज्य शासनाने त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्णय घेतला, तो स्वागतार्ह आहे.
शाम तळोकर, इस्लामपूर (जि. सांगली)
‘बंद’ची प्रथा थांबवावी
अनेक कारणांनी ‘बंद’ पाळला जातो. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, ‘बंद’ काळात जनसामान्यांचे अतोनात हाल होतात. हातावरच्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या अनेकांचे हाल होतात. रस्त्यावर बसून विक्री करणारे असो, दारोदार फिरणारे असो, रस्त्यावरील लहान टपऱ्या असो... या सर्व कमकुवत वर्गाची उपासमार होते. अनेक कारणांसाठी जो ‘बंद’ पाळला जातो, त्यात सर्व स्तरांतील घटकांवर दुष्परिणाम होत असतात. याचा गांभीर्याने विचार करून आणि नैसर्गिक आपत्तीत ‘बंद’ घडून येत असतो. त्यामुळे समाजात एकजूट ठेवून सर्वांनी याचा विचार करून सतत क्षुल्लक कारणासाठी ‘बंद’चे पालन करणे, हे थांबवावे किंवा वेगळ्या पद्धतीने कोणतेही नुकसान न करता या प्रथेत बदल करावा.
राजू जाधव, मांगूर (जि. बेळगाव)
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..