
रिक्षा विसरली सोन्याची बॅग
रिक्षात विसरली दोन
तोळे वजनाची बॅग
कोल्हापूर, ता. २४ ः महिलेची दोन तोळ्यांच्या सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ही घटना घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, की शनिवार पेठेतील एक महिला १७ एप्रिल रोजी दुपारी रिक्षातून मध्यवर्ती बस स्थानक येथे गेली होती. त्यांच्यासोबत एक बॅग होती. त्यामध्ये १४ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच ग्रॅमचे टॉप्स्, एक ग्रॅमच्या दोन लहान अंगठ्या, चार ग्रॅम वजनाची चांदीची चेन असा ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. ही बॅग रिक्षात विसरली, मात्र संबंधित रिक्षाचालक मिळून आला नाही. संबधित महिलेने याबाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
जैविक खतनिर्मिती उपकरणाची चोरी
आजरा ः महाजन गल्ली येथून जैविक खतनिर्मितीच्या उपकरण साहित्याची चोरी झाली आहे. या साहित्याची किंमत २० हजार आहे. याची फिर्याद प्रकाश अनंत पाटील, (महाजन गल्ली) यांनी आजरा पोलिसांत दिली. अज्ञात चोरट्याविरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पाटील यांच्या परसात असलेले जैविक खतनिर्मितीसाठी लागणारे लोखंड, पितळ व स्टील धातूचे स्टरलायझर (निर्जंतुकीकरण करण्याचे उपकरण) व दुसऱ्या उपकरणाचे स्टीलचे टोपण चोरट्यांनी पळवले आहे. आजरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
व्याज वसुलीच्या
कारणातून तरुण बेपत्ता
कोल्हापूर ः व्याजाच्या वसुलीच्या कारणातून तरुण घरातून बेपत्ता झाला. घरात आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचा मजकुराची चिठ्ठी सापडली. याबाबतची नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की शहरात एक महिला राहते. त्यांच्या मुलाने एकाकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या बदल्यात मुलाकडून त्याने गाड्या आणि लाखात पैसेही घेतले. तरीही व्याजाची मागणी सुरू होती. या त्रासाला कंटाळून मुलगा घरात खोटे सांगून निघून गेल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार त्रास देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः कसबा बावडा आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरट्याने दोन मोटारसायकल चोरून नेल्या. हा प्रकार १५ आणि १९ एप्रिल रोजी घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..