पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

17324
प्रशांत कानडे

विजेच्या धक्क्याने
शिरसंगीचा युवकाचा मृत्यू
आजरा, ता. २४ ः शिरसंगी (ता. आजरा) येथील प्रशांत प्रकाश कानडे (वय २३) याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. शनिवारी (ता.२३) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. विठ्ठल आप्पा चौगले यांनी नेसरी पोलिसांत वर्दी दिली. माहिती अशी, काल संध्याकाळी शिरसंगी परिसरात पाऊस पडला होता. यानंतर प्रशांत हा नेहमीप्रमाणे मोळा नावाच्या शेतात जनावरांना पाणी पाजवण्यासाठी गेला होता. यावेळी विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करताना त्याला विजेचा धक्का बसला आणि तो कोसळला. शेतात गेलेला मुलगा परत न आल्यामुळे कानडे कुटुंबीय काळजीत होते. प्रशांतचे वडील प्रकाश कानडे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला; पण प्रतिसाद मिळत नसल्याने ते शेताकडे गेले. त्यांना प्रशांत जमिनीवर पडलेला आढळला. त्याला नेसरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. प्रशांत एकुलता मुलगा होता. तो बीएस्सी अॅग्रीला शिक्षण घेत होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top