
रामभाऊ राशिनकर व्याख्यानमाला -2
17375
इचलकरंजी ः रामभाऊ राशिनकर व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी बोलताना योगेश सोमण.
----
लोगो ः रामभाऊ राशिनकर व्याख्यानमाला
----
हेटाळणी करणाऱ्यांना सावरकर समजले नाहीत
योगेश सोमण; इचलकरंजीत ‘मी सावरकर’ विषयावर व्याख्यान
इचलकरंजी, ता. २४ ः थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर तरुणांना पटणारी तर्कशुद्ध विचारांची मांडणी करत होते. ब्रिटिशांना हाच मोठा धोका वाटत होता. तर काही विशिष्ठ विचारांचे लोक त्यांची जाणीवपूर्वक माफीवीर म्हणून हेटाळणी करतात. त्यांना सावरकर समजलेच नाहीत, असे प्रतिपादन लेखक आणि अभिनेते योगेश सोमण (मुंबई ) यांनी येथे केले.
येथील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य पत संस्थेतर्फे आयोजित कै. रामभाऊ राशिनकर स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना ‘मी सावरकर’ या विषयावर ते बोलत होते. भगतराम छाबडा यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. अरविंद कुलकर्णी यांनी श्री. सोमण यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर जवाहर छाबडा आणि राजेंद्र राशिनकर उपस्थीत होते.
श्री. सोमण म्हणाले, ‘सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. देश स्वतंत्र झाला पाहिजे असे त्यांचे ध्येय होते. त्यांचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड होते. त्यांचे आत्मचरित्र, आणि इतर लिखाण लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यांना दोन काळ्या पाण्याची सजा झाली होती. त्यामधून सुटका होण्यासाठी सावरकर यांनी माफी मागितली हा धादांत खोटा आरोप आहे. जेलमधील नियम अटी यांची माहिती त्यांना होती. त्याआधारे त्यांनी कोर्टाकडे अर्ज केले होते. त्यानुसार लिखाण करून मी निर्दोष आहे, असे म्हणण्यात गैर काय आहे. सावरकर समजून न घेता काही विशिष्ठ विचारधारेचे लोक टीका करतात. सावरकर समजण्यासाठी त्यांच्या पुस्तकाचे वाचन करण्याची गरज आहे.’
सावरकरांनी गाय ही पशु आहे असे म्हटले होते, हे वाक्य मोडतोडीचे आहे. गाय ही उपयुक्त पशु आहे, म्हणून ती पूज्य आहे. तिला मारून खा, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कुठेही म्हटले नाही, असे सांगत सोमण म्हणाले, ‘सुटकेसाठी कोर्टाकडे न्यायालयीन प्रथेनुसार अर्ज विनंती करणे, याला माफी म्हणत नाहीत. जामीन मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यात सावरकर यांचे काय चुकले.’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..