
पावसाने झोडपून
जिल्ह्याला वळवाने झोडपले
कोल्हापूर, ता.२४ : जिल्ह्यात काल रात्री ठिक-ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वळीव पावसाने झोडपून काढले. कागल, आजरा, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर शहरातही या पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत खांबावरील वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुपारपर्यंत त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. कागल, राधानगरी, आजरा, हातकणंगले तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तर मोठ-मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे शहरातील संभाजीरनगर, रामानंदनगर, रंकाळ परिसरात, साने गुरुजी वसाहत परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात ढगांचा गडगडाट जाणवला व वारेही वाहिले, पण तुरळक पावसाने हजेरी लावली.
* पावसाचा अंदाज
जिल्ह्यात आणखी दोन दिवस दरम्यान विजांचा कडकडाट, जोराचा वाऱ्यासह ठिक-ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आकाशात विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहून नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..