
मंगळवार पेठ शिव रॅली
17367
संयुक्त मंगळवार पेठेची शिव रॅली
शिवजयंती उत्सव ः गुरुवारी अश्वारूढ शिवपुतळ्याचे आगमन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः मंगळवार पेठेतील तेरा तालीम संस्था व सुमारे शंभरहून अधिक तरुण मंडळांच्या वतीने मंगळवार पेठेची शिखर संस्था असलेल्या राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे आज भव्य मोटारसायकल शिव रॅली झाली. संयुक्त मंगळवार पेठेच्या वतीने यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, गुरुवारी (ता.२८) अश्वारूढ शिवपुतळ्याचे आगमन होणार आहे.
मंगळवार पेठ परिसर, महाव्दार रोड, शिवाजी पुतळा, बिंदू चौक परिसरातून निघालेल्या या रॅलीत सुमारे साडेतीनशे मोटारसायकलींसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतूराज क्षीरसागर, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. पूर्ण रॅलीतही ते सहभागी झाले. यावेळी गोपी पोवार, हृतिक गवळी, स्वरूप निंबाळकर, आर्यनिल जाधव, प्रसाद खोराटे, अजिंक्य साळोखे, संकेत गवळी, अनिकेत घोटणे, प्रथमेश भोसले, अवधूत शिंदे यांच्यासह अशोक पोवार, रमेश मोरे, निवास शिंदे, सुनील मोहिते, बाबा पार्टे, बाळासाहेब पाटील, संदीप चौगले, जयसिंग शिंदे, बाबूराव चव्हाण, राजेंद्र कुरणे, महेश जाधव आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..