भाजप कंदील आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कंदील आंदोलन
भाजप कंदील आंदोलन

भाजप कंदील आंदोलन

sakal_logo
By

17359

महाविकास आघाडीत राज्य अंधारात

राहुल चिकोडे; वीजटंचाईच्या विरोधात भाजपतर्फे कंदील आंदोलन

कोल्हापूर, ता. २४ ः राज्यातील सध्याच्या वीजटंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून, राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे, दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत आहेत, असे असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली थांबवावी. महाविकास आघाडीने राज्याला अंधाराच्या खायीत लोटले आहे, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला. भाजपतर्फे आज बिंदू चौकात कंदील आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील वीजटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात विविध विविध ठिकाणी कंदील आंदोलन होत आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बिंदू चौक येथे एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
‘राज्याला अंधकारात ढकलणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो’, ‘धेर नगरीचा चौपट ऊर्जामंत्री...कोळसा गायब झाला.’ अशा घोषणा दिल्या.
श्री. चिकोडे म्हणाले, ‘राज्य सराकराच्या कारभाराला कोणतेही धोरण नाही. सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आहेत. अडीच वर्षांपासून दररोज एका नवीन विषयावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहे. वेगवेळ्या मार्गाने दिशाभूल करून लोकांच्याकडून पैसे गोळा करण्याचे काम हे सरकार करत आहे. कोळसाटंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विजेच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर आता भारनियमनाऐवजी देखभाल दुरुस्तीचे कारण देत वीज वितरणच बंद ठेवून जनतेला वेठीस धरले जात आहे. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, मंडल अध्यक्ष डॉ राजवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर, संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, प्रदीप पंडे, आशिष कपडेकर, महेश यादव, अतुल चव्हाण, प्रवीण शिंदे, गिरीश साळोखे, संजय जासूद, ओंकार घाटगे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top