
यल्लूर अपघात पंधरा जण जखमी
येलूर येथील आराम बस
अपघातात १५ जण जखमी
कोल्हापूर ः येलूर फाटा येथे मुंबई ते गडहिंग्लज प्रवास करणाऱ्या खासगी आराम बसचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपक काटे, स्वाती कळवीकट्टे, सदाशिव कृष्णा अंबाळे (सर्व रा. गडहिंग्लज तालुका), सुवर्णा जगदीश पाटील, वाजवी जगदीश पाटील, रोहिणी निशांत विणेकर (सर्व रा. मुंबई), दिनकर रामजी इक्के (गडहिंग्लज), ज्योती संजय पाटील, संकेत सुभाष कुपटे (दोघे रा. मुंबई), रामचंद्र आप्पा बरबळकर (आजरा तालुका), विनायक बाळासाहेब केसरकर (रा. कागल तालुका), अनिता शंकर राईकर, अनुराग राजेंद्र देसाई, निखिल शंकर राईकर, राजू बाबू हैबले अशी जखमींची नावे आहेत.
काच लागून तरुण जखमी
कोल्हापूर : जवाहरनगरातील कारखान्यात काम करताना काच फुटल्याने तरुण जखमी झाला. जमीर रहमान जमादार (वय ३५) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..