
दंगल घडवणाऱ्या भाजपचा विरोध
१७३६०
भाजप, संघपरिवाराविरोधात
पुरोगामी संघटनांचे आंदोलन
कोल्हापूर, ता. २४ ः देशात धार्मिक दंगली करणाऱ्या भाजप आणि रा.स्व.संघाचा निषेध करण्यासाठी आज पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी आंदोलन केले.
बिंदू चौक येथे आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. सर्व संघटनांचे कार्यकर्ते बिंदू चौकात संध्याकाळी एकत्र आले. त्यांनी ‘भाजपची सुपारी घेणाऱ्या राज ठाकरे, नवनीत राणा यांचा धिक्कार असो’ भारतीय संविधान जिंदाबाद, ‘हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम है सारे भाई भाई!’ अशा घोषणा दिल्या. भाजप आणि रा.स्व.संघ देशाला हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवत आहेत. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील निवडणुका जिंकण्यासाठी धार्मिक दंगली घडवल्या जातात. राम, हनुमान, भोंगे हे विषय पुढे करून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सरकारी उद्योगांचे खासगीकरण या मुद्द्यांना बगल दिली जात आहे. या धोरणाविरोधात व शांतता सलोख्याचे आवाहन करण्यासाठी संविधानवादी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व संघटनांनी महागाई बेरोजगारी शेती संकट यासारख्या प्रश्नांवर येणाऱ्या काळात एकत्र यावे, असे आवाहन वक्त्यांनी केले.
माजी आमदार संपतराव पाटील-पवार, गिरीश फोंडे, संभाजी जगदाळे, सतीशचंद्र कांबळे, उत्तम पाटील, व्यंकाप्पा भोसले, वसंत पाटील यांनी केले. यावेळी बाबूराव कदम, अनिल चव्हाण, आर्फत मालदार, आर. एस. आलासे, राज कोरगावकर, मधुकर पाटील, सुमन पाटील, रमेश वडणगेकर, मुकुंद कदम, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, पंकज खोत, शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनता दल आमआदमी पार्टी. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..