गिजवणेत मोफत आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिजवणेत मोफत आरोग्य तपासणी
गिजवणेत मोफत आरोग्य तपासणी

गिजवणेत मोफत आरोग्य तपासणी

sakal_logo
By

17406
गिजवणे : ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व एसजीएम ऑन्को कॅन्सर हॉस्पिटलतर्फे झालेल्या मोफत आरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन करताना सतीश पाटील. शेजारी पौर्णिमा कांबळे, माणिक पाटील, नितीन पाटील, रमेश पाटील आदी.

गिजवणेत मोफत आरोग्य तपासणी
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व एसजीएम ऑन्को कॅन्सर हॉस्पिटल (महागाव) यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या शिबिरात मौखिक आजारांची तपासणी, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, पुरुषांची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात आली. रुग्णांना औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता कोरे, लक्ष्मण शिंदे, अन्नपूर्णा नाईक, केदारी कुंभार, आदित्य पाटील, भूषण गायकवाड, अमित देसाई, स्नेहल दळवी, शिल्पा पाटील, शशिकला पोटजाळे, सुगंधा कुंभार, वर्षा पाटील, ग्रामविकास अधिकारी अर्जुन रेडेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top