‘श्रमुद’च्या सात मागण्यांबाबत प्रशासनाकडून लवकरच तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘श्रमुद’च्या सात मागण्यांबाबत प्रशासनाकडून लवकरच तोडगा
‘श्रमुद’च्या सात मागण्यांबाबत प्रशासनाकडून लवकरच तोडगा

‘श्रमुद’च्या सात मागण्यांबाबत प्रशासनाकडून लवकरच तोडगा

sakal_logo
By

17563
आजरा ः येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्याशी चर्चा करताना संपत देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी.

‘श्रमुद’च्या सात मागण्यांबाबत
प्रशासनाकडून लवकरच तोडगा
शिष्टमंडळाशी बैठक; आजरा तहसिलवरील मोर्चा रद्द
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ ः खेडगे गावाला स्वंतत्र महसुल गावचा दर्जा देण्याबाबत तातडीने कार्यवाही करणार असून श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांच्या विविध सात मागण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून त्याबाबतही लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही प्रातांधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी बरोबर बैठक झाली. या आश्‍वासनानंतर
श्रमिक मुक्ती दलातर्फे उद्या (ता. २६) येथील तहसीलदार कार्यालयावर निघणारा मोर्चा मोर्चा रद्द करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बारवे होत्या. या वेळी संपत देसाई प्रमुख उपस्थित होते. आंबेआोहळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत गडहिंग्लज येथे ४ मे रोजी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
चाफवडे गावचे खासबाब प्रस्तावाचे पैसे मंजूर झाले असून कागदपत्रे जमा केल्यास तातडीने वाटप केले जाईल. घळभरणीमुळे कृषी पंप पाण्याखाली जाणार आहेत. त्यांना तातडीने नवीन वीज जोडणी देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नवीन स्वयं पुनर्वसित वसाहतीला जोडणी देण्यासाठी निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झाला आहे. पावसाळ्यापुर्वी जोडणी दिली जाईल. एरंडोळ धरणातील प्रकल्पग्रस्तांना जमीन कसण्यासाठी होणारा अडथळा तातडीने दूर केला जाईल, सर्फनातील गावठाण संपादनाबाबत असलेल्या तक्रारी दूर करण्यासाठी तात्काळ बैठक लावली जाईल यासह मागण्याबाबत कार्यवाही तातडीने करणार असल्याचे बारवे यांनी सांगितले. सर्फनालाचे उपअभियंता शरद पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी, दशरथ घुरे, नारायण भडांगे, हरी सावंत, गंगाराम ढोकरे, अनिल मनुनेकर, धोंडीबा सावंत, विष्णु मांजरेकर, शिवाजी गुरव, बजरंग पुंडपळ, सागर सरोळकर, भिमराव माधव, शंकर पाटील, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top