सकाळ प्रकाशन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ प्रकाशन बातमी
सकाळ प्रकाशन बातमी

सकाळ प्रकाशन बातमी

sakal_logo
By

१७५६५

लिहिणाऱ्या हातांना ‘सकाळ’चे पाठबळ
लिखाण संस्कृती बळकट करण्यासाठीचा उपक्रम; सहभागी होण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचे लिखाण पुस्तक रूपात छापून यावे अशी इच्छा असते. त्यांच्या लिखाणाला प्रकाशित करण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने हा उपक्रम हाती घेतला असून, नुकत्याच झालेल्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत ‘सकाळ’ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर यांनी लेखकांशी संवाद साधत त्यांना पुस्तक प्रकाशन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. या उपक्रमात लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘सकाळ’ माध्यम समूहाची प्रकाशन संस्था असून, त्या माध्यमातून नवोदित लेखक, प्रस्थापित लेखक आणि इतर लिखाणाशी संबंधित तज्ज्ञ मंडळी यांचे लेखन प्रकाशित होत असते. आज वर ‘सकाळ’ने सहाशेपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत, तीस लाखांपेक्षा जास्त पुस्तके वितरित केली आहेत.
पुस्तकांचे प्रकाशन कसे करावे? याविषयी अनेक प्रश्‍न असतात. या असंख्य प्रश्‍नांचे निरसन करण्यासाठी आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘एनीवन कॅन पब्लिश वुईथ सकाळ पब्लिकेशन्स’ ही संकल्पना समोर आणली. या संकल्पनेची माहिती नवोदित लेखकांना व्हावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत वाचन संस्कृती, लिखाण संस्कृती जोपासण्यासाठी ‘सकाळ’ प्रकाशनाबद्दल माहिती देत सूज्ञ आणि चांगले लेखक घडावेत म्हणून काय करता येईल, याबाबत श्री. रामगीर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लेखकांचे साहित्य मुद्रित, डिजिटल माध्यमातून वाचकांपर्यंत नेण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यासाठी जागतिक पातळीवरील निर्मिती, वितरण, प्रकाशन तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकाशन प्रक्रिया, पुस्तक निर्मिती, लेखकांच्या मनात असणारे गैरसमज यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर माहिती या कार्यशाळेत रामगीर यांनी दिली.
.......
या उपक्रमाचे फायदे
- हवे तेव्हा हवं तिथं पुस्तक उपलब्ध करून देण्याची शाश्‍वती
- मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं पुस्तकांचा साठा करण्यासाठी लागणारा खर्च, जागा आणि ऊर्जा वाचेल.
- लेखकाने ‘रेडी टू प्रिंट फाईल’ दिली तर ४८ ते ७२ तासांत त्याचे (छापील) पुस्तक प्रकाशित होईल. अगदी एका पुस्तकापासून ते शंभर, हजार कितीही पुस्तकं छापून वेळेत पोहोच करण्याची यंत्रणा ‘सकाळ’कडे आहे.
-sakalpublications.com, अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल.
- आधी प्रकाशित झालेली पुस्तके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या उपक्रमाचा फायदा होईल.
- पुस्तकाचे कॉपीराईट हे लेखकाकडे सुरक्षित असतील.
- पारदर्शी व्यवहार, लेखकांशी सुटसुटीत करार, रास्त दरात आर्थिक व्यवहार, अधिक टक्केवारीने रॉयल्टी, ठरवून दिलेल्या वेळेत.
- लेखक फ्रेंडली, कमी खर्चिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा फायदा जास्तीतजास्त लेखक आणि वाचकांचा व्हावा हाच उद्देश या उपक्रमाचा राहील.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top