पार्किंगवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंगवर कारवाई
पार्किंगवर कारवाई

पार्किंगवर कारवाई

sakal_logo
By

17596, 17597

शहरात चार रुग्णालयांची पार्किंग खुली
प्रशासकांनी दिले आदेश; महापालिकेकडून राजारामपुरीत धडक मोहीम
कोल्हापूर, ता. २५ : राजारामपुरी परिसरातील चार हॉस्पिटलची बंदिस्त केलेली पाच पार्किंग महापालिकेने कारवाई करून खुली केली. येथील वाहनांचे रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीसही अडथळा येत होता.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी राजारामपुरी येथील नगररचना विभागामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या होत्या. यामध्ये राजारामपुरीतील काही हॉस्पिटलच्या इमारतीचे पार्किंग अनधिकृतपणे बंदिस्त करून वापर केला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. ही पार्किंग खुली करून रस्त्यावर होणारे पार्किंग बंद होण्यासाठी प्रशासक बलकवडे यांनी नगररचना विभागाला सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार आज वाघाडिया हॉस्पिटल, कोल्हापूर मॅटर्निटी हॉस्पिटल, व्हाईट लाईन हॉस्पिटल, गुरुप्रसाद हॉस्पिटलवर कारवाई केली. यामध्ये जेसीबीच्या साहाय्याने इमारतीच्या भिंती जमीनदोस्त केल्या. तसेच अनेकांनी पार्किंग केवळ भिंतीवर लिहिले होते, पण आतमध्ये वैद्यकीय उपकरणे ठेवली होती. तसेच वैद्यकीय व्यवसायासाठी वापर केला जात होता. अशी बंदिस्त पार्किंग खुली करण्यात आली. प्रशासक बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर रचनाकार हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले, बाबूराव दबडे व नगररचना विभाग, विभागीय कार्यालय तीन व चारने केली.

चौकट
कॅम्पनंतर पुन्हा कारवाई
उद्या (ता. २६) व बुधवारी (ता.२७) नगररचना विभागामध्ये विकास परवान्यासाठी विशेष कॅम्प आयोजिला आहे. त्यामुळे ही मोहीम कॅम्प झाल्यानंतर पुन्हा करण्यात येणार आहे. ज्या इमारतींमध्ये पार्किंग बंदिस्त करून त्याचा अनधिकृत वापर केला जात आहे, ते बंद करून रस्त्यावरील पार्किंग सुरळीत करावी. अन्यथा पार्किंग खुली करण्याची कारवाई करण्याचा इशारा नगररचना विभागाने दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top