निकाल
नाशिकच्या बाळू बोडकेला सुवर्ण
नगरच्या ऋषिकेश लाडवर १०-० असा एकतर्फी विजय
लोगो
लढती वजनी गटातल्या
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ७ : महाराष्ट्र केसरीच्या मैदानात रात्री नऊपर्यंत झालेल्या फेऱ्यांत ८६ किलो गादी विभागात नाशिकच्या बाळू बोडके याने नगरच्या ऋषिकेश लाड याच्यावर १०-० असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदकाची मोहोर उमटविली. ६१ किलो वजनी गटात गादी विभागात कोल्हापूर शहरच्या विजय पाटीलने अटीतटीच्या लढतीत एका गुणांकनाच्या फरकाने सोलापूरच्या तुषार देशमुखचा पराभव केला.
६४ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज अटीतटीच्या व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या पाहावयास मिळाल्या. ८६ किलो वजनी गटात रौप्य पदकाचा मानकरी नगरचा ऋषिकेश लाड ठरला. कोल्हापूर जिल्ह्याचा किरण पाटील याने साताऱ्याच्या विशाल राजने याच्यावर ५-२ गुणांकनाने विजय मिळवून कास्यपदक पटकाविले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेली पुणे शहराचा अभिजित भोईर व पुणे जिल्ह्याचा प्रतीक जगताप यांच्यात समान गुण झाले होते. यामध्ये तांत्रिक गुण व उच्चतम डावाच्या आधारावर अभिजित भोईर याला विजयी घोषित केले.
६१ किलो वजनी गटात रौप्य पदकाचा मानकरी सोलापूरचा तुषार देशमुख ठरला. कास्य पदकाच्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या बाबा शेडगेने अमरावतीच्या गोविंद कावडे याच्यावर १२-० गुणांकन मिळवीत एकतर्फी विजय मिळविला. साताऱ्याच्या विशाल सूळ याने जळगावच्या करण परदेशीवर एकतर्फी विजय मिळविला.
.............
चौकट
......
माती विभागात पाथरूटला सुवर्णपदक
८५ किलो माती विभागात सोलापूरच्या श्रीनिवास
पाथरूटने सुवर्ण, साताऱ्याच्या रणजित राजमानेने रौप्य, तर मुंबई उपनगरच्या राम धायगुडेने कास्य पदक पटकाविले.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.