‘गुरुकुल’मध्ये क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुरुकुल’मध्ये क्रीडा महोत्सव
‘गुरुकुल’मध्ये क्रीडा महोत्सव

‘गुरुकुल’मध्ये क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

00033
अब्दुललाट : सनतकुमार दायमा यांचा सत्कार करताना गणेश नायकुडे आदी.
----
‘गुरुकुल’मध्ये क्रीडा महोत्सव
अब्दुललाट, ता. ६ ः विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. भावनिक सामाजिक आणि बौद्धिक विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारे मैदानी खेळ विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारासाठी झटले पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्याप्रती जागरुक असले पाहिजे, असे प्रतिपादन उद्‍घाटक सनतकुमार दायमा यांनी केले. येथील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. मान्यवरांच्याहस्ते ध्वजवंदन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी मार्गदर्शन केले. धीरजकुमार पारख, सौ. नविता नायकुडे, सौ. बालिका पाटील, सौ. रेवती मगदूम, उर्मिला डोंगरे, रूपाली कागे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उर्मिला डोंगरे यांनी केले. आभार पूजा महाजन यांनी मानले.