Fri, Jan 27, 2023

चांदोली येथे वणव्याबाबत मार्गदर्शन
चांदोली येथे वणव्याबाबत मार्गदर्शन
Published on : 20 January 2023, 5:51 am
चांदोलीत जैवविविधतेबाबत मार्गदर्शन
आंबा : सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यानच्या वतीने चांदोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जैवविविधता व वणव्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा होणारा शिरकाव, पश्चिम घाटातील जैवविविधता, वणव्यामुळे जैवविविधतेची हानी, त्यावरील उपाय आणि जनजागृती याबाबत निसर्ग संवादक तज्ज्ञ सचिन धायगुडे व तेजल गुरव यांनी मार्गदर्शन केले. वनपाल एच. ए. गारदी, शिवाजी पाटील, वनरक्षक उस्मान मुल्ला, अरविंद पाटील, बाबासो कांबळे, गोरख सोनार, मुख्याध्यापक आकाराम पाटील, प्रदीप जाधव उपस्थित होते. महादेव कुंभार यांनी सूत्रसंचालन व उमेश नांगरे यांनी आभार मानले.