आंबा विशाळगड मार्गावर पर्यटन प्रवेश शुल्क नाक्याची उभारणी, पर्यटकांना आता वीस रुपये मोजावे लागणार.

आंबा विशाळगड मार्गावर पर्यटन प्रवेश शुल्क नाक्याची उभारणी, पर्यटकांना आता वीस रुपये मोजावे लागणार.

1818

मानोली ः येथील धरणाजवळ पर्यटन प्रवेश शुल्क नाक्याची उभारणी केली आहे.
...

मानोली धरणाजवळ पर्यटन
प्रवेश शुल्क नाक्याची उभारणी

प्रतिव्यक्ती वीस रुपयेः सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत राहणार प्रवेशबंदी

आंबा ता. १०ः वन्यजीवांच्या अधिवासास बाधा पोहोचू नये व जंगल परिसर स्वच्छ रहावा, यासाठी आंबा - विशाळगड मार्गावर मानोली धरणाजवळ पर्यटन प्रवेश शुल्क नाक्याची उभारणी केली आहे.
किल्ले विशाळगड व पावनखिंड येथे जंगलमार्गे जाणाऱ्या पर्यटकांना यापुढे प्रतिव्यक्ती वीस रुपये मोजावे लागणार आहेत. वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती मानोली यांच्या माध्यमातून या नाक्याची उभारणी केली आहे. या मार्गावर सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व वाहनांना व पर्यटकांना प्रवेश बंदी राहणार आहे. जंगलामध्ये प्लास्टिकचा वापर, धुम्रपान, मद्यपान अथवा गैरवर्तन करणाऱ्यांस दंड अथवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
...

‘पर्यटकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या, मद्याच्या बाटल्या जंगलातच टाकल्या जातात. यामुळे वन्यजीवांना इजा पोहोचते. हे टाळण्यासाठी व जंगल परिसर स्वच्छ राखण्यासाठी वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे. करातून जमा होणाऱ्या निधीचा वापर जंगल स्वच्छता व ग्रामविकासासाठी करण्यात येणार आहे. यातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

कृष्णा दळवी, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, मानोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com