
वारणा कापशीत दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
01858
वारणा कापशी : येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला.
वारणा कापशीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
आंबा : वारणा कापशी येथील सिध्देश्वर हायस्कुलमधील दहावीच्या १९८९-९० च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. गामा कराळे, अर्जुन बंडगर, सुनील गायकवाड यांनी मेळाव्याची रूपरेषा स्पष्ट केली. निवृत्त शिक्षक पी. बी. शेळके यांनी बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्नेहमेळाव्यास कापशी, शिवारे, माणगाव, आकुर्ळे येथील माजी विद्यार्थी बत्तीस वर्षांनंतर एकत्र आले होते. उपस्थितांनी अनुभवकथन केले. शेळके यांनी गतकाळातील शाळेचा प्रवास कथन करत शाळेच्या पटांगणात बापूजी साळुंखे यांचा पुतळा उभा करण्याचे आवाहन केले. यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे स्पष्ट केले. मिराज नायकवडी, श्रीरंग कुंभार, सुरेश पाटील, सुरेश कोकाटे, डी. एस. पाटील यांनी परिश्रम घेतले.