कडवी धरण ९१ टक्के भरले

कडवी धरण ९१ टक्के भरले

Published on

कडवी धरण ९१ टक्के भरले

आंबाः शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील कडवी धरण ९१ टक्के भरले आहे. धरणातून १८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कडवी नदीत सुरू आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रात १०५ मिमी पाऊस पडला. पुराच्या पाण्याने भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते - सावर्डे व सरूड - पाटणे हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पश्चिम भागातील आंबा, मानोली, परळे निनाई, विशाळगड, येळवण जुगाई येथे पावसाची संततधार सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.