‘डी. वाय.’ ची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डी. वाय.’ ची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील
‘डी. वाय.’ ची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील

‘डी. वाय.’ ची 15 जानेवारी अखेरची ऊस बिले जमा : आ.सतेज पाटील

sakal_logo
By

00882
‘डी. वाय.’ची १५
जानेवारीअखेरची बिले जमा

असळज, ता. ६ : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याने चालू हंगामात १ ते १५ जानेवारी पंधरवड्यात गाळप उसाचे २० कोटी ५० लाख ८६ हजारांचे ऊस बिल ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप केलेल्या ६८ हजार ३६२ मे. टन उसाचे ३००० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे.
ते म्हणाले, ‘५ फेब्रुवारीअखेर ४ लाख १५ हजार ७४० टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ५० हजार १५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून हंगामात आजअखेर ३ कोटी ८४ लाख ३९ हजार ५१२ युनिट वीजनिर्मिती केली असून कारखाना वापर वजा जाता २ कोटी ५९ लाख ९२ हजार युनिट वीज निर्यात केली. गाळप उद्दीष्ट पूर्ततेसाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.