
श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकी जोपासावी : गटविकास अधिकारी माधुरी परीट
00888
श्रमसंस्कार शिबिरातून
बांधिलकी जोपासावी : परीट
असळज, ता. ९ : देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मत गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी व्यक्त केले. धुंदवडे (ता. गगनबावडा) येथे म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगीतर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ होते.
शिबिराचे उद्घाटन धुंदवडेचे सरपंच एम. जी. पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून झाले. आठ दिवस चालणाऱ्या शिबिराची रूपरेषा प्रास्ताविकातून कार्यक्रमाधिकारी ए. डी. पिंजरकर यांनी मांडली. ए .बी. पाटील, एम. जी. पाटील, डॉ. बी. एस. पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौधरी, रंगराव सुतार, दशरथ पाटील, मेघा पाटील, शुभांगी सुतार, रोहिणी कांबळे, पोलिसपाटील तानाजी मोहिते, सेवा संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विनोद कांबळे, आभार डॉ. डी. एस. पवार यांनी मानले.