पळसंबेचा सागर वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एन.टी. बी प्रवर्गातून राज्यात तिसरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसंबेचा सागर वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एन.टी. बी प्रवर्गातून राज्यात तिसरा
पळसंबेचा सागर वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एन.टी. बी प्रवर्गातून राज्यात तिसरा

पळसंबेचा सागर वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एन.टी. बी प्रवर्गातून राज्यात तिसरा

sakal_logo
By

00920
पळसंबेचा सागर वरंडेकर
एनटीबी प्रवर्गातून राज्यात तिसरा
असळज, ता.३ : पळसंबे (ता. गगनबावडा) येथील सागर सुरेश वरंडेकर राज्यसेवा परीक्षेत एनटीबी प्रवर्गातून राज्यात तिसरा आला. राज्यसेवा परीक्षेतील यशाबद्दल ग्रामस्थांनी त्याची जल्लोषी मिरवणूक काढली.
सागरचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पळसंबे व असळजला झाले. तिसंगीच्या म. ह. शिंदे महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सागरची आई सुरेखा व वडील सुरेश यांनी शेती, जनावरे सांभाळून सागरचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. लहान भाऊ सुशीलने हॉटेलमध्ये काम करून सागरला मोलाची साथ दिली. ठाणे पीएफ ऑफीसचे रिजनल कमिशनर सुनील चिवटे यांचे सागरला मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अभ्यास केल्याने यश मिळाले. गटविकास अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी पदावर संधी मिळण्याची शक्यता असून या माध्यमातून लोकाभिमुख काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सागरने दै. ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.