व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्याख्यान
व्याख्यान

व्याख्यान

sakal_logo
By

00929
तिसंगीत ‘जोडीदार निवडताना’ व्याख्यान
साळवण ः ‘आयुष्यात जोडीदार निवडताना मुलींनी संपत्ती, जात, धर्म यापेक्षा स्वभाव, आरोग्य अशा गोष्टी पाहून निवड करावी, असे मत राजश्री साकळे यांनी व्यक्त केले. म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी येथे सहेली व्यक्तिमत्व विकास मंच आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जोडीदार निवडताना’वरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्र-प्राचार्य डॉ. बी. एस. पडवळ होते, तर प्रमुख उपस्थिती ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडेचे सचिव स्वप्नील शिंदे होते. यावेळी एम. ए. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ. एस. के. मेंगाणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. व्ही. यू. जाधव यांनी परिचय करून दिला. डॉ. आर. एम. वाघमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शर्वरी नाळे हिने केले.