रोपलावण

रोपलावण

Published on

01065

गगनबावडा तालुक्यात
भात रोप लावणीस प्रारंभ
साळवण, ता. ७ : पावसास सुरुवात झाल्याने शेतीपंपाद्वारे नदीपात्रातील पाणी उपसा करून गगनबावडा तालुक्यात शेतकरी वर्गाने भात रोप लावणीस सुरूवात केली आहे. रोप लागणीमुळे शेतशिवारे माणसांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. पाणी उपसा करून रोपलावण करण्याच्या प्रयत्न शेतकरी वर्ग करत आहे. तालुक्‍यात सहकारी शेती करण्‍याकडे शेतक-यांचा कल आहे.
मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात भाताचा तरवा केला जातो. साधारणतः तीन आठवडयानंतर ही रोपे लावणी योग्‍य होतात. जूनच्‍या तिस-या आठवड्यात भात रोप लागणीस सुरूवात होते. चालूवर्षी मात्र पावसाने दडी मारल्‍याने तालुक्‍यात रोप लावणीचे काम एक आठवडा उशिराने सुरू झाले आहे. सध्‍याच्‍या यांत्रिकीकरणाच्‍या जमान्‍यात बैलजोडी सांभाळणा-या हौशी शेतक-यांची संख्‍या खूपच कमी झाली आहे. त्‍यामुळे पॉवर ट्रेलर, लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केला जात आहे. काही मोजक्याच शेतकरी वर्गाकडे बैलजोडी आहे. मनुष्‍यबळाची कमतरतेमुळे शेतकरी एकत्र येऊन शेती करताना दिसत आहे. एकत्र येऊन शेती करण्‍यामुळे कामे वेळेवर होत असून कौटुंबीक जिव्‍हाळाही वाढीस लागत आहे.

चौकट -
दिवसा वीज पुरवा
महावितरणच्‍या नियमाप्रमाणे चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्री वीजपुरवठा केला जातो. पण सध्‍या पावसाळ्यामुळे रात्री विजेचा उपयोग करता येत नाही. त्‍यामुळे दिवसा वीज कपात न करता ती सुरू ठेवल्‍यास रोप लावणीची कामे लवकर होण्यास मदत होईल. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्‍यास अडचणीतील बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.