कोदे लघुप्रकल्‍प भरला

कोदे लघुप्रकल्‍प भरला

Published on

01094
कोदे ःयेथील लघुप्रकल्‍प भरला असून सांडव्‍यावरून पाणी वाहू लागले आहे.
...

कोदे लघुप्रकल्‍प भरला

सकाळ वृत्तसेवा

साळवण, ता.१० : गगनबावडा तालुक्‍यात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्‍पातून २६३ क्‍युसेक्‍स पाण्‍याचा विसर्ग सरस्‍वती नदीपात्रात सुरू आहे.
कोदे लघुप्रकल्प परिसरात आज सकाळी संपलेल्‍या चोवीस तासात २१ मिलीमीटर तर आजअखेर १३९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी साडेसहा वाजता हा लघु प्रकल्प भरला. प्रकल्पाच्या सांडव्‍यावरून पाणी वाहू लागले आहे.
जिल्ह्यात लवकर भरणारा लघु पाटबंधारे प्रकल्प म्‍हणून कोदे लघु प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्‍पाची क्षमता ६.०६ द.ल.घ.मी. इतकी आहे. या लघु प्रकल्‍पातून सरस्‍वती नदीवरील कोदे गावापासून निवडे साळवणपर्यंत पाणीपुरवठा होतो. लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रात आज सकाळी संपलेल्‍या चोवीस तासात ६६ मिलीमिटर तर आजअखेर १३५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी मध्‍यम प्रकल्‍प क्षमतेच्‍या ४७ टक्‍के भरला आहे.
...

१४ दिवसात भरला प्रकल्प

२६ जून २०२३ रोजी सकाळी प्रकल्पात ९.५७ टक्के इतका पाणीसाठा होता तर २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या १४ दिवसात झालेल्या ११५३ मिलीमीटर पावसाने १० जुलै २०२३ रोजी सकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. या धरणात गाळाचे प्रमाण जास्‍त असून गाळ काढण्‍याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.