गवा रेड्याच्या हल्ल्यात नरवेली येथे दोघेजण जखमी.

गवा रेड्याच्या हल्ल्यात नरवेली येथे दोघेजण जखमी.

01717, 01718

...
गव्याच्या हल्ल्यात
नरवेली येथे दोघेजण जखमी

गगनबावडा, ता.११ : दुचाकीवरून जाताना गव्याने केलेल्या हल्ल्यात‌ नरवेली पैकी कुंभी धरण वसाहत येथील दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. सुरेश पांडुरंग कोकरे व शुभम संतोष कोकरे अशी त्यांची नावे आहेत. नरवेली-गगनबावडा दरम्यानच्या ओढ्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, सुरेश व संतोष कोकरे हे दोघेजण आपल्या दुचाकीवरून सायंकाळी नरवेली गावाकडून गगनबावड्याकडे निघाले होते. गावची हद्द संपताच लागणारी ओढ्यावरील मोरी पार करताच डाव्या बाजूला दबा धरून बसलेल्या एका गव्याने प्रमुख रस्त्यावर उडी घेतली. काही समजण्याच्या आतच त्याने दुचाकीलाच धडक मारली. धडक इतकी जोरात होती की, गाडी एकीकडे तर हे दोघेजण तिसरीकडेच पडले. शुभम कोकरे याच्या डोक्याला गंभार जखम झाली आहे. तर सुरेश याच्या उजव्या हाताचे हाड मोडले आहे. त्यांच्‍यावर गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. गगनबावडा वनपाल अमर बेटाळे, वनरक्षक भगवान कांबळे, नितीन शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com