गव्याच्या हल्ल्यात मांडुकलीतील शेतकरी गंभीर

गव्याच्या हल्ल्यात मांडुकलीतील शेतकरी गंभीर

गव्याच्या हल्ल्यात मांडुकलीतील शेतकरी गंभीर
सकाळ वृत्तसेवा
गगनबावडा, ता. ३ : उसातील पाणी परतण्यासाठी गेले असता अचानक समोरून आलेल्या गव्याने हल्ला केल्याने मांडुकली (ता. गगनबावडा) येथील शेतकरी धोंडिराम भाऊ पाटील (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडुकली येथील धोंडिराम पाटील हे बसाटा नावाच्या शेतातील ऊस पिकास पाणी पाजत होते. सरीतील पाणी बदलण्यासाठी ते उसात गेले असता समोरून अचानक आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. जोराने मारलेल्या धडकीने एक शिंग त्यांच्या उजव्या मांडीत शिरले. रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्यांने मदतीसाठी आरडाओरडा केला. किंकाळी ऐकून बाजूचे शेतकरी जमा झाले.
घटनेची माहिती समजताच वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, वनसेवक बाजीराव पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. जखमी शेतकऱ्यास ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांनी निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले व तेथून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com