डी. वाय. पाटील कारखाना परिसरात वृक्षारोपण

डी. वाय. पाटील कारखाना परिसरात वृक्षारोपण

01736
असळज : कारखाना परिसरात वृक्षारोपण करताना कारखान्याचे सेक्रेटरी नंदकुमार पाटील, बाजीराव पाटील, पी. बी. देशमुख, पर्यावरण अभियंता अमर भांबुरे व अन्य.

डी. वाय. पाटील कारखाना परिसरात वृक्षारोपण
असळज : पर्यावरणाचे रक्षण आणि संगोपन करणे गरजेचे आहे. सांघिक भावनेतून पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण अभियंता अमर भांबुरे यांनी स्वागत केले. कारखान्यातर्फे केलेल्या वृक्षारोपणाची माहिती त्यांनी यावेळी दिली. चिफ केमिस्ट पी. बी. देशमुख, मुख्य अभियंता बाजीराव पाटील, हेड टाईम किपर भालचंद्र पाटील, सिव्हिल इंजिनिअर विजय पाटील, ऊस विकास अधिकारी सुनील पाटील, व्हेईकल इनचार्ज उदय पडवळ आदींच्या हस्ते कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. भांबुरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com