सेंद्रिय शेतीचा अवलंब करुन प्रगतशील व शाश्वत शेती करा : गटविकास अधिकारी अलमास सय्यद

सेंद्रिय शेतीचा अवलंब करुन प्रगतशील व शाश्वत शेती करा : गटविकास अधिकारी अलमास सय्यद

Published on

01815
सेंद्रिय शेतीचा अवलंब करा
अलमास सय्यद; कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

साळवण, ता. ३ : कृषी क्षेत्रात स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब करत शेतक-यांनी प्रगतशील व शाश्वत शेती करावी; असे आवाहन गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी व्यक्त केले. निवडे (ता.गगनबावडा) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागामार्फत आयोजित कृषी दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रारंभी हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड यांनी कृषीविषयक तालुक्याची स्थिती व योजनांची माहिती दिली. यावेळी संगीता सुरेश पाटील (कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी), हेमा संजय कांबळे (महिला सक्षमीकरण), शारदा संजय पाटील (महिला उद्योजकता), संभाजी महादेव पडवळ (आदर्श कृषीमित्र), विनायक जाधव (आदर्श कृषी सहाय्यक) यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. माजी सभापती बंकट थोडगे, माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव, शेणवडेचे उपसरपंच प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डी. वाय. पाटील कारखान्याचे संचालक महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी कृपेश टोणपे, सरपंच सरिता दीपक पाटील, कृषी विस्तार अधिकारी डी. के. जाधव, शंकर पाटील, कृषी पर्यवेक्षक बी. आर. पाटील, जे. जे. पाटील, कृषी सहाय्यक एस. के. बळीप, प्रदीप गावडे यांच्यासह संजय आढाव, शिवाजी राऊत, सुंदर पाटील, सचिन जाधव, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.