

03180
कुंभी प्रकल्पात ५९.२९ टक्के पाणीसाठा
गगनबावडा, ता. ४ : गगनबावडा तालुक्यातील लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्पात ५९.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अणदूर लघु प्रकल्पात ६६.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेला पाणीसाठा सिंचनासाठी ३० जूनअखेर पुरेल; असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
गगनबावडा, पन्हाळा व करवीर अशा तीन तालुक्यांतील ५४ गावांतील ८ हजार ७११ हेक्टरमधील पिके सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कुंभी मध्यम प्रकल्प महत्वपूर्ण मानला जातो. एकूण ७६.८८ दलघमी एकूण पाणीसाठा असलेल्या धरणात सध्या ४५.५८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील कोदे लघु प्रकल्पात ५२.४८ टक्के, अणदूर लघूप्रकल्पात ६६.०९ टक्के तर वेसरफ लघूप्रकल्पात ४३.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होईपर्यंतच्या कालावधीत शेती पिके व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल यासंबंधीचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
कोट :
पाण्याचा वापर काटकसरीने करा
यावर्षी पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढती उष्णता, भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कोगे पाटबंधारे शाखा कळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.