
बिद्री च्या उपसरपंचपदी आनंदा पाटील
01591
बिद्री उपसरपंचपदी आनंदा पाटील
बिद्री : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार हसन मुश्रीफ गटाचे आनंदा महादेव पाटील यांची निवड झाली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग चौगले होते. उपसरपंच शीतल गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड झाली. ग्रामपंचायतीवर आमदार मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक गटाची सत्ता असून ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उपसरपंच शीतल गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा सत्कार माजी सरपंच व विद्यमान सदस्या आनंदी पाटील यांच्या हस्ते झाला. नूतन उपसरपंच आनंदा पाटील यांचा सत्कार सरपंच पांडुरंग चौगले यांच्या हस्ते झाला. यावेळी सदस्य अशोक पोवार, सागर कांबळे, सुशांत चौगले, शोभा चौगले, शोभाताई पाटील, सुलोचना पाटील, पूजा पाटील, पांडुरंग पाटील, राजाराम चौगले, शिवाजी पाटील, विजय पाटील, यशवंत गुरव, प्रकाश ढवण, शहाजी गायकवाड, राजेंद्र चौगलेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.