विशाळी अमावस्येमुळे मुधाळतिट्टा येथे वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशाळी अमावस्येमुळे मुधाळतिट्टा येथे वाहतूक ठप्प
विशाळी अमावस्येमुळे मुधाळतिट्टा येथे वाहतूक ठप्प

विशाळी अमावस्येमुळे मुधाळतिट्टा येथे वाहतूक ठप्प

sakal_logo
By

01613

मुधाळतिट्टा : येथे कोल्हापूर रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी. याच गर्दीत अडकून पडलेली रुग्णवाहिका.
....


मुधाळतिट्टा येथे अमावस्येमुळे वाहतूक ठप्प

वाहनधारक त्रस्त; प्रवासी, वृद्धांचे हाल, स्थानिकांनाही मनस्ताप

सकाळ वृतसेवा

बिद्री ता. २१ : विशाळी अमावस्येनिमित्त आदमापूर येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने मुधाळतिट्टा येथे दिवसभरात वारंवार वाहतूक ठप्प झाली. याचा फटका अन्य प्रवासी आणि वाहनधारक यांना बसला. तर रुग्ण आणि वृद्धांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शिवाय स्थानिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुधाळतिट्टा येथे नेहमीच वाहनांची गर्दी होते. याठिकाणी वाहतुकीला शिस्त नसल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप होतो. तसेच राधानगरी-निपाणी मार्गावर कॅनॉलवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाला पर्यायी वाहतुकीसाठी पूल नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
आज, शनिवारी अमावस्या असल्याने सकाळपासूनच मुधाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारक, वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी यांचे मोठे हाल झाले. या कोंडीमुळे मुदाळ, बोरवडे पाटी, बिद्री, आदमापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी रस्त्याकडेला किंवा मिळेल तेथे गाड्या लावून बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणे पसंत केले.
...

दोन रुग्णवाहिकांनाही फटका

आजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक, वृद्ध प्रवासी, शालेय विद्यार्थी यांचे मोठे हाल झालेच शिवाय या दरम्यान कोल्हापूरकडे जाणाऱ्या दोन रुग्णवाहिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जवळपास तासभर या रुग्णवाहिका रस्त्यावरच अडकून पडल्या होत्या. शेवटी अन्य नागरिकांनी या रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून दिल्याने चालक व रुग्णांचे नातेवाईक यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
....