बिद्री ''च्या घोडदौडीत कामगारांचे योगदान महत्वपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्री ''च्या घोडदौडीत कामगारांचे योगदान महत्वपूर्ण
बिद्री ''च्या घोडदौडीत कामगारांचे योगदान महत्वपूर्ण

बिद्री ''च्या घोडदौडीत कामगारांचे योगदान महत्वपूर्ण

sakal_logo
By

89579

‘बिद्री’च्या घोडदौडीत कामगारांचे
योगदान महत्त्वपूर्ण : के. पी. पाटील

बिद्री ता. १६ : संचालक मंडळ, कामगार व प्रशासनाच्या धाडसी निर्णयामुळे ‘बिद्री’चे नाव देशपातळीवर पोचले. कामगारांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. निवृत्तीनंतर कामगार एकत्रित आल्याने अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पाटील म्हणाले, ‘बिद्री कामगारांना वेळेवर पगार अदा करत असून १२ टक्के पगारवाढ, २८ टक्के बोनस दिला. फिटमेंटचा प्रश्नही सोडवला. नोकरभरती आणि कामगारांसाठी घरकुलांची व्यवस्था करण्याचा मानस आहे.’
यावेळी कामगार नेते आर. वाय. पाटील, आनंदराव अस्वले, भीमराव किल्लेदार, के. पी. बोडके, डी. जी. कांबळे, सुदाम साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजी देसाई, प्रवीण भोसले, उमेश भोईटे, श्रीपती पाटील, अशोक कांबळे, के. ना. पाटील, प्रदीप पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, विकास पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, अधिकारी, खातेप्रमुखांसह आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत तर अजित आबिटकर यांनी आभार मानले.
प्रसंगी बिनविरोधची तयारी
मेळाव्यात काही कामगारांनी अध्यक्ष के. पी. पाटील यांच्याच हातात बिद्री कारखाना सुरक्षित असून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याचा उल्लेख करत पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करायला हरकत नाही. प्रसंगी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगितले.