Fri, March 31, 2023

भेडसगाव यात्रा
भेडसगाव यात्रा
Published on : 17 February 2023, 5:57 am
भेडसगावात आजपासून विविध कार्यक्रम
भेडसगाव : महाशिवरात्री यात्रेनिमित्त भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे आज (शनिवार) पासून यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयसिंग लगारे यांनी दिली. आज (ता. १८) जागृत नीलकंठेश्वर देवास अभिषेक, मोहर अर्पण करणे, उद्या (ता. १९) भंडारा, महाप्रसाद, तसेच मंगळवारी (ता. २१) आनंद माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर निकाली कुस्त्यांचे मैदान भरेल. यावेळी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेचे उपप्रमुख अमरसिंह पाटील, सरपंच तेजस्विनी पाटील, उपसरपंच शुभांगी साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सागर पाटील, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे शाहूवाडी तालुकाध्यक्ष अमर सूर्यवंशी उपस्थित होते.