बागेला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागेला आग
बागेला आग

बागेला आग

sakal_logo
By

00894
आकुर्ळे : येथील माळरानावर लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडलेली आंब्याची बाग.
...

आकुर्ळेत २० एकर आंबा बाग जळून खाक

भेडसगाव, ता. १४ : आकुर्ळे (ता. शाहूवाडी) येथील सुमारे वीस एकर आंबा बाग अज्ञाताने लावलेल्या आगीत जळून खाक झाली. यामध्ये एल. आर. पाटील, बी. आर. पाटील, सुदर्शन पाटील, दशरथ पाटील, सावंत, कुडित्रेकर, राम गायकवाड आदी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बागेच्या सभोवताली जाळ पट्टा काढलेला असतानाही बागेला आग लावली आहे. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी एल. आर. पाटील यांची थोडीफार बाग वाचवण्यात यश आले.
आकुर्ळे येथील शेतकऱ्यांनी आकुर्ळे, माणगाव, कारंडेवाडीच्या खासगी मालकीच्या माळरानात आंबा फळबागेची लागवड केली आहे. या बागेच्या सभोवताली जाळ पट्टा काढलेला असतानाही बागेला आग लागली आहे. बागेच्या आसपासच्या झाडांना देखील या आगीची झळ बसली आहे.
दरम्यान, सरकारने आम्हाला नुकसानभरपाई दिली नाही तरी चालेल, पण जाळ पट्टा काढलेला असताना आगी लावण्याच्या वृत्तीला पायबंद घालावा. तसेच वन खाते, तहसील कार्यालय, पोलिसांच्या मदतीने वणवा प्रतिबंधक उपाययोजना राबवून शेतकरी वर्गाला दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.