
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
01189
भुयेवाडीत मुख्यमंत्री शिंदे
यांच्या वाढदिनी कार्यक्रम
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप झाले. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी, शेतकऱ्यांना अनुदानित योजनांबाबत मार्गदर्शन झाले. पेन्शन योजना, विधवा, अपंगांसाठी योजना, पॅन कार्ड, ई - श्रमिक कार्ड, आधारकार्ड यासारखे उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार यांनी केले. यावेळी शाखाप्रमुख रवी खोचीकर, उपप्रमुख अजित पाटील, माजी पं. स. सदस्य कृष्णात पोवार, दिलीप चव्हाण, नायकू पोवार, विश्वास पाटील, बाबासाहेब पाटील, महादेव साळोखे, शारदा पोवार, बंडा शिंदे, तुकाराम पाटील, विजयकुमार केंद्रे, व ग्रामस्थ उपस्थित होते.