बाजारभोगावाच्या योगिता घोडके होम मिनिस्टर

बाजारभोगावाच्या योगिता घोडके होम मिनिस्टर

01819
बाजारभोगाव ः येथे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेते.


योगिता घोडके पैठणीच्या मानकरी
बाजारभोगाव, ता. १० ः येथील ग्रामपंचायततर्फे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘खेळ रंगला पैठणीचा’ अर्थात ‘होम मिनिस्टर’ या स्पर्धेत योगिता स्वप्नील घोडके या विजेत्या ठरल्या. शिल्पा सतीश कांबळे या उपविजेत्या ठरल्या.
स्पर्धेत ८० महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी विशाल बेलवळेकर - पाटील यांनी विविध स्पर्धा घेतल्या. योगिता घोडके यांना मानाची पैठणी देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या शिल्पा कांबळे याना मिक्सर, तर तृतीय आलेल्या सीमा घोडके याना गॕस शेगडी बक्षीस देण्यात आले. पहिल्या दहामध्ये आलेल्यांना कुकर, तर उपस्थित प्रेक्षकांतील पाच महिलांचा सन्मान करण्यात आला. या सर्व विजेत्या महिलांना सरपंच सीमा हिर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com