भोगेश्वर यात्रा पुरवणी लेख

भोगेश्वर यात्रा पुरवणी लेख

83224, 83225, 83227, 83229, 83230

पट्टी ः स्वयंभू भोगेश्वर यात्रा विशेष, बाजारभोगाव

बाजारभोगावचे ग्रामदैवत
स्वयंभू भोगेश्वर

‘करवीर महात्म्य’ या ग्रंथात पाचवे लिंग म्हणून उल्लेख असणारे स्वयंभू भोगेश्वराचे महात्म्य मोठे आहे. याठिकाणी अगस्ती ऋषींनी लोपमुद्रेसह येऊन स्वयंभू भोगेश्वराचे दर्शन
घेतले होते. नवरात्री उत्सवात भोगेश्वरास फक्त वाटीभर तीर्थावर नऊ दिवस नऊ रात्र उभे राहून नवरात्र केले जाते. अशा जागृत भोगेश्वर देवाची यात्रा अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या सोमवारी होते. आज (सोमवार) होणाऱ्या यात्रेनिमित्त...
-------------------

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस तीस किमी अंतरावर असणारे कासारी नदी तीरावर वसलेले बाजारभोगाव (ता. पन्हाळा) हे गाव आहे. ग्रामदैवत भोगेश्वर मंदिरासह जुगाईदेवी, श्री गणेश, हनुमान, मरगाईदेवी, विठ्ठल मंदिर, मोताईदेवी, भराडीदेवी यांच्या कृपाशीर्वादाने राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत गावाने नावलौकिक मिळवला आहे.

भोगेश्वराचे महात्म्य
संपूज्य पंचमलिंग पश्चिमदिशी आहे भोगावी!
भद्रा नदीस करून स्नान भोगेश्वर संपूज्य!
तत: करवीर मागत!
प्राप्त: स्थान कृत्वा श्रिय संपूज्य!!

श्री करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असणारे पाचवे लिंग म्हणजे पन्हाळा तालुक्यातील कासारी (भद्रा) नदी तीरावर असणारे बाजारभोगावचे ग्रामदैवत स्वयंभू भोगेश्वर होय. या ठिकाणी भद्रा (कासारी) नदीत स्नान करून अगस्ती ऋषींनी लोपमुद्रेसह दर्शन घेतले. तसेच तपश्चर्येस बसले, असा उल्लेख आढळतो.

भोगेश आहे पश्चिमेस! वटेश असे वायव्येस!!
रामेश्वर आहे उत्तरेस! कृष्णेमध्ये बेटावरी पै!!

असाही उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो. वरील श्लोकाचा अर्थ असा ः पश्चिमेस भोगाव गावी भोगेश्वर, वायव्येस वाटेगावात वटवेश्वर तर उत्तरेस बहे गावाजवळ कृष्णा नदीवर रामेश्वर होय.

शिवलिंगाबाबत असणारी आख्यायिका
येथे पूर्वी मोठे अरण्य होते. गावातील गायी या अरण्यात चरावयास जात होत्या. त्यातील एक गाय करवंदीच्या जाळीजवळ दुधाचा पान्हा सोडत असे. याबाबतची माहिती गुराख्यांना कळाली. त्यांनी याची शहानिशा केली असता तेथे स्वयंभू भोगेश्वराचे लिंग आढळले, अशी आख्यायिका आहे. तसेच स्वयंभू भोगेश्वराच्या लिंगावर ११ जोतिर्लिंग आहेत; तर १२ वे जोतिर्लिंग स्वयंभू भोगेश्वराचे शिवलिंग आहे. त्यामुळे या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास १२ जोतिर्लिंगाची यात्रा केल्याचे पुण्य मिळते, असे मानले जाते. तसेच बाजारभोगावपैकी असणाऱ्या मोताईवाडीत ‘मोताईदेवी’ व काऊरवाडीत ‘भराडीदेवी’या दोन्ही वाड्यांत देवींची जागृत अशी शक्तिपीठे आहेत.

उभे नवरात्र
नवरात्री उत्सवात भोगेश्वरास दररोज वाटीभर तीर्थावर दिवस-रात्र उभे राहून नवरात्र केले जाते. असे कडक नवरात्र असणारे भारतातील एकमेव स्थान असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा भोगेश्वर असल्याने दर सोमवारी भक्त दर्शनासाठी येतात. तर मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे केले जातात. भोगेश्वराचे मुख्य मंदिर [गाभारा] पुरातन आहे. मंदिराभोवती खासदार, आमदार यांच्या फंडातून सांस्कृतिक हॉल बांधला आहे. तसेच यंदा नूतन लोकनियुक्त सरपंच सीमा नितीन हिर्डेकर, उपसरपंच युवराज पाटील व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने व लोकवर्गणीतून पहिल्या मजल्याचे सुशोभीकरण केल्याने मंदिर आकर्षक दिसत आहे.

चौकट
यात्रेतील कार्यक्रम असे ः सोमवार १३ मे ः ग्रामदैवत श्री भोगेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता भोगेश्वर देवासह मंदिरातील जुगाई, जोतिबा, हनुमानसह सर्व देवतांना महाभिषेक.
दुपारी १ वा. देवाची अलंकारित महापूजा मंदिराचे पुजारी ॲड. मोहन पाटील व सुधीर पाटील बांधतील. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी सहाला पालखी सोहळा आहे. तसेच मनोरंजनासाठी सुनीताराणी बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. मंगळवार ः पाहुणे, मित्र परिवारास स्नेहभोजन. बुधवार ः महिलांसाठी खास कार्यक्रम आर्केस्ट्रा झंकार.
-------------------

पुरवणी संकलन
धनाजी सदाशिव गुरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com