कासारी नदीवरील  बंधाऱ्याचे बरगे काढण्यास सुरवात

कासारी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्यास सुरवात

01910

‘कासारी’वरील बंधाऱ्याचे
बरगे काढण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

बाजारभोगाव, ता. ८ : राज्यात लवकरच माॅन्सूनचे आगमन होणार, असे हवामान खात्याने जाहीर केल्याने पाटबंधारे विभागाकडून कासारी नदीवरील असणाऱ्या बंधाऱ्यावरील बरगे काढण्याचे काम सुरू झाले आहे.
गतवर्षी पाटबंधारे विभागाकडून योग्य नियोजन न केल्यामुळे उपसाबंदीला सामोरे जावे लागले होते. पण यंदा पाटबंधारे विभागाच्या योग्य नियोजनामुळे यंदा कासारी नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक मिळाले. परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा साधण्यासाठी मशागातीची कामे पूर्ण केली असून रोहिणी नक्षत्रामध्ये भात पिकांचे तरवे पेरले आहेत. चार-पाच दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत आहे. दरम्यान एक जूनपासून बंधाऱ्यात पाणी साठवण्यासाठी असणारे बरगे काढले जात असत. दोन दिवसांपासून कासारी नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यामधील बरगे काढण्याची लगबग सुरू झाली आहे.

कोट
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पिकांना उन्हाळ्यात पाणी मिळेल का, असा प्रश्न होता. पण पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन केल्याने कासारी नदी आजअखेर मुबलक पाणी होते. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना कडक उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
- रावसाहेब काटकर, शेतकरी, पोर्ले तर्फ बोरगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com