अश्विनी राणे यांनी पटकावली मानाची पैठणी;

अश्विनी राणे यांनी पटकावली मानाची पैठणी;
Updated on

03269

अश्विनी राणे यांना मानाची पैठणी

बाजारभोगाव ः ‎पोहाळे तर्फ बोरगाव येथील होम मिनिस्टर कार्यक्रमात मानाची पैठणीचा मान अश्विनी नितीन राणे यांनी पटकावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त महिलांसाठी प्रथमच आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. द्वितीय क्रमांकासाठी चांदीची जोडवी सुचित्रा राजेंद्र खोत, तृतीय क्रमांकासाठी चांदीची बिछवी प्रतिभा रवींद्र माळवी, चांदीची अंगठी प्रियांका सचिन राणे यांना प्रदान करण्यात आली. याशिवाय सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन हास्यकलाकार निखिल केळुसे यानी केले. विविध खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांत ८० वर्षांवरील आजींनीही सहभाग घेतला. त्यांचा माळवी बॉईजतर्फे भागूबाई पाटील, निर्मला पाटील, मालूबाई राणे, लक्ष्मीबाई पाटील, किसूबाई पाटील, गंगूबाई माळवी, मालूबाई पाटील आणि लीलाबाई शिंदे यांना साडी देऊन गौरविले. अध्यक्ष करण कांबळे, उपाध्यक्ष शुभम माळवी, खजिनदार कुमार कांबळे आणि सचिव धनंजय माळवी यांनी आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ashwini Khandagale
Raigad
Youth Loyalty Slabs: Congress Fields ZP Member Mahesh Deshmukh for Tough Electoral Terrain
War Impact Hits Maritime Parts Supply; RoRo Service Put on Hold for Now
Marathi News Esakal
www.esakal.com