
बांबवडे
रहिवासी दाखल्यावरून
शाहुवाडीत चर्चा
बांबवडे ता. १७ ः रहिवासी दाखला काढण्यासाठी पैशांच्या मागणी केल्याच्या चर्चेने आज शाहुवाडी तालुक्याचे ठिकाण दिवसभर चर्चेत राहिले. अंगणवाडीवाडी सेविका पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. कालपासून उमेदवारांनी तहसील रहिवाशी दाखला मिळविण्यासाठी सेतू व महादेवा केंद्राकडे अर्ज केले. काल दुपार पासूनच परंतु ,सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून सेतुतील लोकांनी उमेदवारांना उद्या असे सांगितले.
दरम्यान याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले की, मी आज अॅफिडीव्हीड करण्यासाठी कोल्हापूरला गेलो होतो. तरीही लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून दाखले देण्यासाठी व्यवस्था करुन दिली होती. जर लोकांकडून शासकीय फी व्यतिरिक्त असे सेतू महा ई सेवा किंवा अन्य कोणी बेकायदेशीर पैसे घेतले असतील तर यास बळी पडलेल्या लोकांनी माझ्याकडे सबळ पुराव्यानिशी येऊन तक्रार करावी. मी संबंधितांवर फौजदारी दाखल करुन त्या सेतु किंवा महा ई सेवा केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवतो. लोकांची फसवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करु नये.