
अबॅकस नॅशनल स्पर्धेसाठी निवड
02070
यशस्वी स्पर्धकासह मान्यवर.
अबॅकस नॅशनल स्पर्धेसाठी निवड
बोरपाडळे : कोल्हापूर येथील अबॅकस विभागीय नॅशनल स्पर्धेत स्वामी विवेकानंद मोहरे शाळेच्या समीक्षा कवठेकर, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल देवाळेच्या विहंग मांगलेकर, राजनंदिनी पवार, प्रथमेश घोसाळकर, वारणानगरचे शिवम चोपडे, कार्तिक झरेकर, आराध्या खराडे, निशिता गायकवाड, नीरा जाधव आणि कन्या विद्यामंदिर केर्लेची रुचिता पाटील, तनुजा करपे, आराध्या कोळी, समीक्षा वराबळे, रिया कोळी, श्रुती किल्लेदार, स्वरा वराबळे, सई निकम, अस्मिता यादव, आराध्या यादव, चैत्राली गुरव, सुषमा शिंदे, तनया गायकवाड यांनी यश मिळवले. पंधराशे स्पर्धकांमधून त्यांची पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे भाकरे यांनी सांगितले. विजेत्यांना राऊटर इन्फोटेक प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल संस्थेचे सागर भाकरे, सौ. माळी, मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.