Mon, Jan 30, 2023

मालेत रंगला शिवराय-शंभू भेटीचा सोहळा
मालेत रंगला शिवराय-शंभू भेटीचा सोहळा
Published on : 14 January 2023, 2:39 am
02072
....
मालेत रंगला शिवराय- शंभू भेटीचा सोहळा
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील भवानी मंदिरात १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट झाल्याची इतिहासात नोंद सापडते. येथील ग्रामस्थांना याचा विशेष अभिमान आहे. साहजिकच येथील भवानी मंदिर व ऐतिहासिक परिसराला विशेष महत्त्व आहे. या भेटीच्या अनुषंगाने शिवप्रेमी, तरुण मंडळे आणि ग्रामस्थ विविध उपक्रम आयोजित करत असतात. शुक्रवारी भवानी मंदिरात पूजा- आर्चा, प्रार्थना,पारंपरिक वाद्यांची मिरवणूक, भव्य पालखी सोहळा आदी कार्यक्रम झाले.