Wed, March 29, 2023

बोरपाडळेत महाआरोग्य शिबीर
बोरपाडळेत महाआरोग्य शिबीर
Published on : 13 February 2023, 4:21 am
02141
बोरपाडळे : महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.
बोरपाडळेत महाआरोग्य शिबिर
बोरपाडळे : येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे परिसरातील रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनिया कदम, डॉ. अहिल्या कणसे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक संपत पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. येथील मोफत सुविधांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन प्रा. मोरे, डॉ. कदम, डॉ. कणसे यांनी केले. या वेळी डॉ. अदिती देसाई, पर्यवेक्षिका जयश्री जाधव, निवास गायकवाड, श्रीकांत कुंभार, अनिल मोरे, फडतारे, सुप्रिया पडवळ, अपर्णा बोरकर, रुपाली हिरवे उपस्थित होत्या. काशिनाथ मेंडके यांनी आभार मानले.