मोहरे हायस्कूल, जोतिर्लिंग पब्लिक स्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहरे हायस्कूल, जोतिर्लिंग पब्लिक स्कूल
मोहरे हायस्कूल, जोतिर्लिंग पब्लिक स्कूल

मोहरे हायस्कूल, जोतिर्लिंग पब्लिक स्कूल

sakal_logo
By

02148
बोरपाडळे : सूर्यनमस्कार सादरीकरण करताना माले पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक.
02149
बोरपाडळे : मोहरे हायस्कूलमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक.

मोहरे हायस्कूल, जोतिर्लिंग पब्लिक स्कूल
बोरपाडळे : सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाला मोहरे हायस्कूल आणि जोतिर्लिंग पब्लिक स्कूल, माले (ता. पन्हाळा) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहरे येथे संस्थाध्यक्ष प्रा. शिवाजी मोहिते, सचिव प्रा. शिवाजी मोरे, मुख्याध्यापक किसन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडाशिक्षक शिवाजी शिंदे, प्रमोद डोंगरे व सुनील मोरे यांनी नियोजन केले. लतिका मोहिते, रघुनाथ मदने, जयसिंग पाटील, बाबासो चावरे, विनोद शिंगे, अनिलकुमार पाटील, रंगराव पाटील, मानसिंग दिनकर पाटील, कोमल चव्हाण, सुप्रिया डोंगरे, तानाजी जाधव उपस्थित होते. बातमीदार अनिल एच. मोरे यांनी माहिती दिली. पन्हाळगड एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस कॉम्प्लेक्स संचलित जोतिर्लिंग पब्लिक स्कूल (माले)च्या आवारात सूर्यनमस्कार उपक्रम झाला. या वेळी संस्थापक-अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे यांनी या उपक्रमाबद्दल ‘सकाळ’चे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापिका सविता कळंत्रे यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक एस. बी. रनभिसे, क्रीडाशिक्षक डी. वाय. जगताप आदींचे सहकार्य लाभले.