Tue, March 21, 2023

माले येथील प्रवचन सोहळा
माले येथील प्रवचन सोहळा
Published on : 23 February 2023, 3:44 am
मालेत प्रवचन सोहळा
बोरपाडळे : कोणत्याही देवाचे वा श्लोकाचे नामस्मरण करण्यापूर्वी ओंकार म्हणण्याची प्रथा पूर्वीपासून असून त्याच्या अंगीकारणाने जीवन निर्मळ आणि निरोगी बनण्यास मदत होईल. कोणतीही शारीरिक व्याधी संपवण्याची ताकद ओंकारात असल्याचे प्रतिपादन प्रा. एकनाथ पाटील यांनी केले. ते माले (ता. पन्हाळा) येथील आयोजित प्रवचन सोहळ्यात बोलत होते. यावेळी येथे महामृत्युंजय मंत्राचे जनक मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य लाभल्याचे सांगितले. यावेळी सरपंच उत्तम पाटील, आबाजी पाटील, राजाराम पाटील, पतंगराव चौगुले, सदाशिव सोळसे, मंगल पाटील आणि भाविकांची उपस्थिती होती.