महिलेच्या पोटातील 100 चौ.से.मीची गाठ काढण्यात बोरपाडळेच्या संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

महिलेच्या पोटातील 100 चौ.से.मीची गाठ काढण्यात बोरपाडळेच्या संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

महिलेच्या पोटातील गाठ काढण्यात
संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश
बोरपाडळे : महिलेच्या पोटातील ५० × ५० सेमीच्या आकाराची मोठी गाठ शस्त्रक्रियेने काढण्यात बोरपाडळेच्या संजीवन मल्टीपर्पज हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. कोकरूड (ता. शिराळा) येथील एक महिला पोटात खूप दुखते या कारणाने हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. आशुतोष तराळ यांनी तपासणीनंतर त्यांच्या पोटात एक मोठी गाठ जाणवली. डॉ. तराळ, डॉ. विशाल नाईक, डॉ. पल्लवी गेडाम आदींनी सुमारे दोन तासांच्या अवघड शस्त्रक्रीयेनंतर ती गाठ बाहेर काढली. कर्मचारी सिद्धांत सकटे, रमजन शेख यांचे सहकार्य लाभले. संजिवनी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्वाती पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. स्मिता पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, आनंदराव पाटील, मोहन पाटील, उत्तम नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबत डॉ. तराळ म्हणाले, ‘‘या गाठीमुळे सदर महिला त्रस्त होत्या. काळजीपोटी पुढील तपासणीसाठी गाठीचा अंश पाठवला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com