संजीवनीकडून देवाळे-नावली येथे समाजोपयोगी उपक्रम

संजीवनीकडून देवाळे-नावली येथे समाजोपयोगी उपक्रम
Published on

02760

‘संजीवनी’तर्फे देवाळे, नावलीत
येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

देवाळे, ता. २६ : बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील संजीवनी मल्टीपर्पज फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दीपक पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त वर्षभरात दरमहिन्याच्या २५ तारखेला समाजोपयोगी उपक्रम होत आहेत. शनिवारी (ता. २५) संजीवनी मल्टीपर्पज फौंडेशन तसेच देवाळे व नावली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम झाले. देवाळे सरपंच वसंत थोरात, नावलीचे सरपंच राहुल कांबळे, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन ताटपुजे, नर्सिंग कॉलेज प्राचार्य महेश बामणी तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत धन्वंतरीपूजन झाले. आयुर्वेद व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन रॅली काढली. आरोग्य तपासणी, औषध वितरण, फवारणी, स्वच्छता मोहीम, सर्व्हे, आयुर्वेदिक वनस्पतींचे वृक्षारोपण, स्त्री आरोग्यविषयक मार्गदर्शन असे कार्यक्रम झाले. डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेजसह डॉ. दीपक पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, अध्यापकांचे सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष डॉ. दीपक पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव डॉ. स्वाती पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. स्मिता पाटील, संचालक आनंदराव पाटील, डॉ. बाबासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. नितीन ताटपुजे, प्राचार्य महेश बामणी, प्राचार्य नूरजहा पटेल, प्रशासकीय अधिकारी उत्तम नांगरे आणि मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com