शहापूरजवळ झाड पडून वाहतूक ठप्प

शहापूरजवळ झाड पडून वाहतूक ठप्प

झाड पडून वाहतूक
शहापूरजवळ ठप्प
बोरपाडळे, ता. १: कोडोली ते बोरपाडळे मार्गावरील शहापूर येथे बुधवारी (ता. १) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निंबाळकर यांच्या शेताजवळ असणारे मोठे शिवरीचे झाड पडल्याने वाहनधारकांची चांगलीच कुचंबना झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की; शहापूर येथील गावापासून जवळच असणाऱ्या निंबाळकरांच्या शेताजवळ असणारे एक मोठे झाड भररस्त्यात पडले. दुपारी अचानक कोसळलेल्या झाडामुळे सुमारे तीन तास प्रवाशांना व चारचाकी वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले. इचलकरंजी व हातकणगलेकडे जाहीर सभेसाठी जाणा-या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. तर काही वाहनांनी मिठारवाडी, मोहरे, आरळेमार्गे जाण्याचे पसंद केले. लग्न समारंभ आटोपून गावाकडे परतणाऱ्या बोरपाडळे येथील दीपक जाधव हे सुदैवाने वाचले.त्यांच्यासमोरच झाड पडले. शहापूरचे पोलिसपाटील प्रशांत कडवेकर यांनी रस्ते व बांधकाम विभागाला संपर्क करून सुमारे सायंकाळी साडेपाचला झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच शहापूरच्या तरुणांनी यासाठी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com