सॉफ्टबॉल स्पर्धेतील यशाबद्दल राधिका कळंत्रे हिचा सत्कार

सॉफ्टबॉल स्पर्धेतील यशाबद्दल राधिका कळंत्रे हिचा सत्कार

03077
कोल्हापूर ः सॉफ्टबॉल स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याबद्दल राधिकाचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. सोबत मान्यवर.
............
सॉफ्टबॉल स्पर्धेतील यशाबद्दल
राधिका कळंत्रे हिचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. २३ : पंजाब येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबद्दल अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते राधिका शिवलिंग कळंत्रे हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे तसेच डॉ. पी. एस. पाटील, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, क्रीडा संचालक व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. बनसोडे आदी उपस्थित होते. राधिका सध्या वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात एम. एस्सी.चे शिक्षण घेत आहे. तिने आतापर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण तसेच रौप्यपदके पटकावली आहेत. तिला वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभल्याचे ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com